Tuesday, October 2, 2012

स्वराज्याचे गुप्तहेर... !

   कोणत्याही राज्याचा सैन्याची मुख्य फळी म्हणजे त्याचं हेरखातं. राजाच्या आणि राजमंडळाच्या योजनांचं आणि मोहीमेचं निम्म यश हे गुप्तहेरांवरच अवलंबून असतं. शिवाजी महाराजांचं हेरखातंही अत्यंत कुशल आणि उत्तम होतं. ते खरच
 इतकं गुप्त होतं, की शिवाजी महाराजांच्या हेरखात्यात नेमकी किती माणसे कामाला होती आणि त्यांचं दैनंदिन कामकाज कसं चाले हे आजही न उकललेलं एक गुढच आहे ! शिवकालीन अस्सल साधनांची, म्हणजेच, अस्सल मोडी पत्रे, विश्वसनिय बखरी, शकावल्या, करीने, ताम्रपट अथवा इतर उल्लेख आणि अनेक ठिकाणचे दफ्तरखाने तपासले असता, अगदी मोजक्याच नावांचे उल्लेख मिळतात.
   त्यात बहिर्जी नाईक जाधव, विश्वासराव नानाजी दिघे देशपांडे-मुसेखोरेकर, वल्लभदास गुजराती, सुंदरदास प्रभूजी गुजराती, महादेव माळी अशी काही नावे आढळतात. पैकी, आपल्याला आजवरच्या संशोधनातून एवढे नक्की माहित आहे की, स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात, साधारण शायिस्तेखानवरच्या लाल महालातील छाप्यापर्यंत स्वराज्याच्या हेरखात्याचा प्रमुख हा, मोसे खोर्यासतला देशपांडे, विश्वासराव नानाजी दिघे या नावाचा एक जबरदस्त माणूस होता. महाराजांच्या अफजलखानाशी झालेल्या युद्धात, पुढे 
अफजलवधानंतर प्रतापगड ते कोल्हापूर हा पट्टा जिंकून घेण्यात आणि महाराज पन्हाळ्यावर अडकले असतानाही मोंगलांच्या आक्रमणाच्या बातम्या राजगडावर जिजाऊसाहेबांना देण्यात जी कामगिरी विश्वासरावांनी बजावली त्याला तोड नाही.
    यानंतर (नक्की तारिख उपलब्ध नाही, परंतू संशोधनातून समजू शकते) महाराजांनी काही कारणास्तव, कदाचित विश्वासरावांच्या वयोमानामूळे असावे कदाचित, पण त्यांना विश्रांती देऊन त्यांच्या जागी त्यांच्याइतक्याच धडाडीच्या आणि निधड्या छातिच्या एका माणसाची हेरखाते प्रमुख म्हणून निवड केली, हे होते, बहिर्जी नाईक जाधव ! यानंतर मात्र शिवाजी महाराजांच्या सबंध हयातीत बहिर्जी नाईक जाधवच हेरखात्याचे प्रमुख राहीले. या बहिर्जींनीही अतिशय उत्तम कामगिर्यात केल्याचे दाखले आहेत.
    त्यातील सर्वांत मुख्य कामगिर्या म्हणजे सुरतेची लूट (पहिली आणि दुसरीही) आणि महाराज आग्र्याात अडकले असताना अतिशय गुप्तपणे केलेली कामगिरी ! गुप्तहेर खात्याचेही दोन विभाग होते. म्हणजे, खुद्द अधिकृत (ऑफिशियल) गुप्तहेर खात्यातील हेर आणि परराज्यात जाणारी वकील मंडळी ! जे खुद्द गुप्तहेर खात्यातच ‘नोकरीला’ असत त्या लोकांची ओळख फारशी कोणालाच पटत नसे. हे लोक इतके बेमालूम पद्धतीने काम करीत की त्यांच्या घरच्यांनाही समोरचा माणूस आपलाच कोणीतरी आहे हे ओळखता येत नसे. आता घरच्यांचीच ही अवस्था तर शत्रू काय ओळखणार म्हणा !
    हे गुप्तहेर निरनिराळ्या वेशात शत्रूच्या गोटातील बातम्या हरतर्हेतने महाराजांपाशी वा महाराज नसतील तर पंतप्रधान, सरसेनापती अथवा स्वराज्याच्या तितक्याच तोलामोलाच्या अधिकार्याजपाशी पोहोचवत असत. मग यात प्रसंगी संत, गोसावी-बैरागी, पीर, गारुडी, कुड्मुडे ज्योतिषी, पाणक्ये, फितूर म्हणून आलेले, शस्त्रांना धार लावणारे, घोड्यांना नाल ठोकणारे, वेठबिगारी अशी कोणतीही कामे करायला हे हेर तयार असत. हरप्रकारे, कोणालाही समजणार नाही याची काळजी घेत, सर्वत्र भिरभीरती आणि तिखट नजर ठेवून हे स्वराज्याचे हेर आपली कामगीरी अतिशय चोख बजावीत असत. प्रत्येक वेळी शत्रूच्या गोटातील गुप्तहेराला आपले काम सोडून बाहेर जाणे, अथवा स्वत:हून महाराजांकडे खबर पोहोचवायला जमत नसे. याकरताच, काही ठाराविक अंतरावर, स्वराज्याच्या हेरखात्याची माणसे निरनिराळ्या कामांच्या निमित्तानेच तैनात केलेली असत. हे हेर एका साखळी पद्धतीने काम करून बातम्या अतिशय वेळच्या वेळी, अतिशय जलदगतीने महाराज कुठीही असतील तरी पोहोचत्या करत असत. हेरांची दुसरी फळी म्हणजे महाराजांची वकीलमंडळी !
    परराज्यात बोलणी करायला जाणारी वकीलमंडळीही उत्तमप्रकरे अतिशय अचूक बातम्या आणत असत. मूळात महाराज एखाद्या तिखट नजरेच्या आणि अत्यंत सावध, आणि अत्यंत हुशार अशा माणसालाच आपला वकील म्हणून पाठवत असत. सोनोपंत विश्वनाथ डबीर पंतसुमंत, त्यांचे चिरंजीव त्र्यंबक सोनदेव डबीर, सोनोपंतांचे जावई रघुनाथ बल्लाळ कोरडे, रघुनाथ बल्लाळ अत्रे पंतसबनिस, सखोपंत कृष्ण लोहोकरे, मुल्ला हैदर उर्फ काझी हैदर, पंताजी गोपिनाथ बोकील अशा वकीलमंडळींची नावे आपल्याला सापडतात. महाराजांच्या या बिलंदर वकीलांची कामगिरी पहा- महाराजांनी स्वाराज्याच्या उभारणीच्या सुरुवातीला आदिलशाहाच्या ताब्यातील एकेक प्रदेश अतिशय झापाट्याने काबिज करून घेतला. पण महाराजांनी आणखी एक डाव टाकला तो म्हणजे, आदिलशाहीच्या जिंकलेल्या मुलुखाला मान्यता मिळवण्यासाठी महाराजांनी आपल्या वकीलाला, सोनोपंत डबीर या शहाजीराजांच्या विश्वासातल्या अत्यंत मुत्सद्दी आणि अनुभवी ब्राह्मणाला औरंगजेबाकडे वकील म्हणून पाठवले. औरंगजेबालाही आश्चर्यच वाटले, कारण महाराजांनी मुलुख तर जिंकला होता आदिलशाहाचा, आणि ते परवानगी मात्र मागत होते औरंगजेबाची !


   बिचार्याच औरंगजेबाला वाटले, शिवाजी आपल्याशी लढण्याआदीच आपल्याला वचकून राहतोय, त्याने सोनोपंतांसोबत महाराजांना एक पत्र पाठवून दिले, “… सांप्रत विजापूरकरांकडीलजे किल्ले, जो मुलुख तुम्हांकडे आहे, त्यास आमची मंजुरी आहे. तुमच्यावर आमचा पूर्ण लोभ आहे…”. हे पत्र होते दि. २३ एप्रिल १६५७ चे.. पण औरंगजेबाला हे माहीत नव्हते की, आपल्याकडे जो माणूस वकील म्हणून आला आहे तो किती उचापती आहे. सोनोपंतांनी औरंगजेबाला हरभर्याआच्या झाडावर चढवून ठेवले आणि हळूच त्याच्या सैन्यात फेरफटका मारून त्याच्या सैनिकांकरवी मोंगलांच्या ‘आतल्या’ बातम्या काढून आणल्या… आणि बरोबर एका आठवड्यानंतर, दि. ३० एप्रिल १६५७ रोजी, महाराजांनी आपल्यासोबत पाच-सहाशे मावळ्यांना घेऊन मोंगलांचे एक अतिशय महत्त्वाचे ठाणे, पेठ जुन्नर अक्षरशः लुटले. लाखो रुपयांनी भरलेल्या जुन्नरच्या तिजोर्याह रिकाम्या झाल्या !

   औरंगजेबाला ही बातमी समजल्यानंतर त्याचा तिळपापड उडाला. अर्थात औरंगजेबाला केव्हा ना केव्हा ही बातमी समजणार हे महाराजांनाही ठावूक होतेच ! म्हणूनच त्यांनी सोनोपंतांचे जावई रघुनाथ बल्लाळ कोरडे यांना पुन्हा औरंगजेबाकडे वकील म्हणून पाठवले. रघुनाथपंतही आपल्या सासर्यांईप्रमाणेच बिलंदर होते. त्यांनी अतिशय गोड गोड बोलून, हरप्रकारे औरंगजेबाचा राग शांत केला आणि वर शिवाजी महाराजांचा पश्चात्तपाचा निरोपही सांगितला. अखेरीस औरंगजेबानेही महाराजांना मोठ्या ‘उदार मनाने’ माफ केले ! कारण त्यालाही सगळ्यांच्या आधी दिल्लीची गादी बळकवण्याची घाई झाली होती. महाराजांचे आणखी एक वकील पंताजी गोपिनाथ बोकील यांची कामगिरी तर फारच जबाबदारीची होती. महाराजांनी पंताजीपंतांना अफजलखानाकडे वकील म्हणून पाठवले होते.

महाराज पंतांना काका म्हणत असत, हे अफजलखानालाही ठावूक होते. अफजलखानासारख्यामहाबलाढ्य शत्रूला सतत ‘शिवाजी महाराज आपणाला भितात, घाबरतात’ अशा मधाचे बोट चाटवून वाईपासून प्रतापगडापर्यंतआणण्याची महत्वाची कामगिरी काकांनी केली. याशिवाय खानाच्या मनातील दुष्ट हेतू आणि खानाच्या सैन्यातील परिस्थिती वेळोवेळी महाराजांकडे बिनाकसूर पोहोचती करून महाराजांना सावध केले. एकदा तर खानाने पेचच टाकला, त्याने काकांना म्हटले, ‘मी प्रतापगडाखाली आल्यावर शिवाजी दगा करणार नाही याची जबाबदारी तुम्ही घेत असाल तर मी येतो. कारण तुम्ही जुनारदार (जुनार म्हणजे जानवं) म्हणजेच ब्राह्मण आहात ! ब्राह्मणाचा शब्द फार पवित्र असतो, तेव्हा तुम्ही मला खार्ती द्या !’ पंतांना महाराजांच्या मनातले ठावूक होतेच.

पण अशा भावनिक प्रसंगातही काकांनी महाराजांकरीता आणि स्वराज्याकरीता बेधडक खोटी शपथ घेतली, आणि अफजलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणले ! या आणि अशा अनेक कामगिर्याीमंध्ये, किंबहूना प्रत्येकच कामगिरीत हेरखात्याने अतिशय उत्तम कामगिरी बजावली होती. महाराजांच्या शायिस्तेखानावरील छाप्यात महाराजांना लाल महालातील एक माळी बातम्या पुरवत असे. महालात घडणार्या लहान लहान घटना महाराजांना अतिशय तपशिलवार समजत असत. बघितले, महाराजांचे हेर कुठे कुठे पोहोचले होते ते ! हेर म्हणजे राजाचा जणू तिसरा डोळाच ! हेराच्या दृष्टीने जणू राजांच शत्रूच्या मुलुखात नजर फिरवत असतो. त्यामूळे हेरखात्यात अतिशय सावधानता बाळगावी लागत असे.

एखादाही हेर फितूर होऊन चालत नसे. जर असे झाले तर मोहीमेचे यश पाण्यातच गेले असे समजायचे ! हेर हा अत्यंत चाणाक्ष, बुद्धीमान आणि हरहुन्नरी असत. शिवाजी महाराजांची लष्करी व्यवस्था आणि हेरखाते इतके अचूक होते की, मोंगली सरदारांना आणि खुद्द बादशाहालाही कधिकधी असे वाटे, ‘या शिवाजीला चेटूकच अवगत असले पाहीजे, त्याशिवाय तो असा ‘अचानक आणि अचूक’ हल्ले करणार नाही’…

अर्थात त्या बिचार्यां ना महाराजांच्या गुप्तहेरखात्याच्या या ‘करामती’ माहीत नव्ह्त्या म्हणून ते या अशा भाबड्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत. पण यातूनच आपल्याला स्वराज्याच्या गुप्तहेरांचे महत्व दिसून येते. बहुत काय लिहिणे ? स्वराज्यासाठी जिवाची बाजी लावून आपले काम चोख बजावणार्या् या निधड्या छातीच्या गुप्तहेरांना मानाचा मुजरा !!

No comments:

Post a Comment